एका 'अमृताची' दृष्ट त्यांना लागली हो..; अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं कवितेतून प्रत्युत्तर

एका 'अमृताची' दृष्ट त्यांना लागली हो..; अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं कवितेतून प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

जून महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथींदरम्यान शिवसेनेत (Shivsena) मोठी बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात झालेल्या या बंडात शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर ओढवलेल्या या नामुष्कीवरून अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती. कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, असं विधान अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलं होत.त्यानंतर आता शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांच्या टीकेला कवितेतुन तून प्रत्युत्तर दिलं आहे.

किशोरी पेडणेकरांनी केलेली कविता -

''एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव

मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केली

त्याला एका 'अमृता'ची दृष्ट लागली हो..

त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले...

अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली...'' अशा शब्दांत अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

एल कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. सुबोध भावेंनी (Subodh Bhave) त्यांना सवाल करण्याआधी त्यांना कशी नशीबानं थट्टा मांडली हे पिंजरा चित्रपटातील गाणं त्यांना ऐकवण्यात आले. गाण्याच्या एक दोन ओळी ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, हे गाणं ऐकताच कोणाचा चेहरा समोर येतो असा प्रश्न त्यांनी विचारला असता, त्यांनी लगेच उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी हेही सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांचा मानसन्मान ठेवते मात्र हे गाणं ऐकल्यानंतर मात्र मला उद्धव ठाकरे यांचाच चेहरा समोर येतो असंही त्यानी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com