राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किसनराव जोर्वेकर

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किसनराव जोर्वेकर

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

जळगांव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी तालुका वि.का.सह.ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन तथा टाकळी प्र.चा.ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच किसनराव जोर्वेकर यांची नियुक्ती जळगांव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट रविंद्र पाटील यांनी केली आहे.

सदरचे नियुक्तीचे पत्र रविंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव आणि जळगांव जिल्हयाचे निरिक्षक अविनाश आदीक, चाळीसगांव तालुक्याचे माजी आमदार आणि जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीव देशमुख, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता योगेश देसले, युवक राष्ट्वादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, प्रदेश संघटक नामदेव चौधरी, ओ.बी.सी.सेलचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या उपस्थित दिले.

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, रांजणगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जीभाऊ आधार नगरसेवक सुर्यकांत ठाकूर, रविंद्र चौधरी आदि उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com