दगड जरा वरती लागला असता तर...; सोमय्यांचा हल्लाबोल

दगड जरा वरती लागला असता तर...; सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

काल भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station ) राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्यावर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती...

या प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर माझ्यावर काही शिवसैनिकांनी हल्ला (Attack) केला.

मी पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती पोलिसांनी शिवसैनिकांना (Shivsainik) दिली होती. माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे ठाकरे सरकारचा हात आहे. या हल्ल्याला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) जबाबदार आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या (Shivsena) ७० ते ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आहे. माझा जीव घेण्याचा प्रयत्न खर पोलिसांच्या सहाय्याने शिवसेनेच्या गुंडांनी केला. या हल्ल्यात मी थोडा जखमी झालो. हा दगड जर चार इंचवर लागला असता तर मी आंधळा झालो असतो. ठाकरे सरकारला माझा मनसुख हिरेन करायचा आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माझ्या नावाने खोटी एफआयआर (FIR) दाखल केली. ही एफआयआर खोटी असून त्यावर मी सही करणार नाही असे सांगितले. यावरून मला धमकवण्यात आले आणि सही केली नाही तर एफआयआर (FIR) होईल, असे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.