आता अनिल परबांचा नंबर; किरीट सोमय्यांनी शेअर केले 'ते' फोटोज

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

मुंबई | Mumbai

काही भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आता पुन्हा सक्रीय झाले आहेत. आता त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी टार्गेट केले आहे...

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. त्यात म्हंटले आहे की, आता अनिल परबांचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामसाठी आलेला पैसा....चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.

याआधीही किरीट सोमय्यांनी अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे समोर आणली होती. बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) नावाचा आरटीओ अधिकारी अनिल परबांचा वाझे आहे. असा उल्लेख सोमय्या यांनी केला होता.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींचे कोकणात अनधिकृत बंगले असल्याचा आरोपही केलेला होता. आता त्यांनी अनिल परब यांचे किनारपट्टी भागात बंगले असल्याचे म्हटले आहे. सोमय्यांनी ट्विटमध्ये रिसॉर्टचा फोटोदेखील टाकलेला आहे.

याप्रकरणी केंद्र सरकारने (Central Government) तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दापोली कोर्टात (Dapoli Court) ३० मार्चला सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com