Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; कपड्यांची बॅग तयार ठेवावी'

‘देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; कपड्यांची बॅग तयार ठेवावी’

मुंबई । Mumbai

मनी लॉंड्रिंग प्रकरणी (Money laundering case) महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीने (Enforcement Directorate ED) छापे टाकले आहेत.

- Advertisement -

तसेच, परब यांच्यावर ईडीने गुन्हाही दाखल केला आहे अशीही माहिती समोर आली आहे. आज गुरुवार रोजी सकाळी पहाटे पासूनच ही छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी परब यांच्या शासकीय निवास्थानीही छापेमारी करण्यात आली आहे.

दरम्यान ED च्या या कारवाईनंतर भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोमय्या यांनी परब यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा किरीट सोमय्या व्हिडिओ ट्विट करत दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या