
मुंबई | Mumbai
डिसेंबर महिना म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा महिना. नवं वर्ष सुरू होताना आपण गेल्या वर्षात काय केलं आणि येत्या वर्षात आपल्याला काय करायचं आहे याचं गणित मांडतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले आहेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.
नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मविआच्या ५ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचं कुटुंबासह अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरण, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख करत या सर्वांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.