Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकिरीट सोमय्यांचे आता उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवर आरोप

किरीट सोमय्यांचे आता उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवर आरोप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आज आयकर विभागामार्फत (Income Tax) कारवाई करण्यात आली. शिवसेनेच्या नेत्यांनी ही संबंधित कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे…

- Advertisement -

दरम्यान, किरीट सोमय्यांनी ‘डर्टी डझन्स’ अशा नावाने १२ नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यात जाधव कुटुंबीय आणि महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नावांचा समावेश त्यांनी केला आहे.

कारवाईदरम्यान सोमय्या दिल्लीला (Delhi) रवाना झाले आणि त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जाधव कुटुंबीय आणि कंत्राटदारांचे संबंध त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, काल डर्डी डझनची यादी मी प्रसिद्ध केली होती. पण यामध्ये दोन नावे राहिली होती. यामध्ये यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि पत्नी यामिनी जाधव (Yamini Jadhav) आणि महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी नावे राहिली होती. या सर्वांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत.

मुंबईच्या महापौरांनी आणि त्यांची कंपनीने हे मान्य केले आहे. अशाच पद्धतीने यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरापासून यासाठी पाठपुरावा करत होतो, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रींग (Money laundering) करतात त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावर गेला आहे. उद्धव ठाकरेंनी मे २०२० मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवले होते. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली.

अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये मिळवले. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले.

उदय शंकर महावार (Uday Shankar Mahawar) हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्ड्रींग करणारा उदय महावार आहे. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल याबद्दल माहिती नाही.

सोनिया गांधीच्या (Sonia Gandhi) नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्ड्रींग उदय शंकर महावारने केले आहे. ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांनी जाहीर केलेली यादी

अनिल परब

संजय राऊत

सुजीत पाटकर

भावना गवळी

आनंद अडसूळ

अजित पवार

हसन मुश्रीफ

प्रताप सरनाईक

रवींद्र वायकर

जितेंद्र आव्हाड

अनिल देशमुख

नवाब मलिक

- Advertisment -

ताज्या बातम्या