...म्हणूनच उद्धव ठाकरे अटक करा म्हणतात; किरीट सोमय्यांचे टीकास्त्र

...म्हणूनच उद्धव ठाकरे अटक करा म्हणतात; किरीट सोमय्यांचे टीकास्त्र

मुंबई | Mumbai

आयकर विभागाने (Income Tax Department) शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर छापेमारी (Raid) केली. हे राजकीय षड्यंत्र असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हंटले आहे. सलग चार दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरु आहे. या छाप्यांमधून काही महत्वाचे दस्तऐवज हाती लागले आहेत....

यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, यशवंत जाधवांनी कोट्यावधींची बक्षीसे मातोश्री बंगल्याला दिली. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची (Shridhar Patankar) कोट्यावधींची प्रॉपर्टी ईडीने (ED) जप्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा एका कोमोस्टॉक कंपनीचा सात कोटी रुपयांचा मनी लॉंड्रींगचा व्यवहार बाहेर आणला आहे.

त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना भीती वाटते आहे. म्हणून ते म्हणत आहेत की मलादेखील अटक करा, मी ही जेलमध्ये जायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही घोटाळे केले आहेत तर त्याची कारवाई होणारच, असे सोमय्यांनी म्हटले आहे.

यशवंत जाधव यांची डायरी चौकशीदरम्यान आयकर विभागाच्या हाती लागली. त्यात जाधव यांनी दोन कोटी रुपये 'मातोश्री'ला दिल्याचा उल्लेख आहे. मातोश्री या म्हणजे कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या आईला पैसे दिल्याचे सांगितले. आईला दानधर्म करण्यासाठी पैसे दिल्याचा खुलासा आहे. यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.