Thursday, April 25, 2024
Homeराजकीयदेशमुख, परब यांच्यानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाडांचा नंबर

देशमुख, परब यांच्यानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाडांचा नंबर

सोलापूर – भ्रष्टाचार्‍यांच्या यादीत महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

एका खासगी दौर्‍यानिमित्त सोमय्या सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी मनपा, कोविड सेंटर्स, रुग्णालयांना भेटी देत आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सचिन वाझेंसोबत पाच अधिकारी निलंबित झाले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, परमबीर सिंग घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या नावाखालीमोठा भ्रष्टाचार केला आहे. या ठाकरे सरकारच्या कोविड भ्रष्टाचाराला भाजपा विरोध करत आहे. हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणार्‍या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे, असं सोमय्या यावेळी म्हणाले.

यावेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं आगे -आगे देखो होता हैं क्या असंही सोमय्या म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या