Monday, April 29, 2024
Homeराजकीयकॅबिनेट मंत्री असलेल्या तिसऱ्या 'अनिल' चा घोटाळा उघडकीस आणणार

कॅबिनेट मंत्री असलेल्या तिसऱ्या ‘अनिल’ चा घोटाळा उघडकीस आणणार

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार घोटाळेबाज असून अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर लवकरच कॅबिनेट मंत्री असलेल्या तिसऱ्या ‘अनिल’ चा कागदोपत्री सबळ पुराव्या आधारे घोटाळा पुढील आठवड्यात उघडकीस आणणार असल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे गैरव्यवहारात अडकलेला तिसरा ‘अनिल’ नेमका कोण याबाबत चर्चा रंगली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या बोलत होते. त्यामुळे गैरव्यवहारात अडकलेला तिसरा ‘अनिल’ नेमका कोण याबाबत चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरे यांची शिवसेना हास्यास्पद आहे. हे डाकूचं सरकार आहे, असा घणाघातही सोमय्या यांनी केला. त्याचबरोबर आठवड्याभरात 5-7 लोकांची झोपमोड होऊ द्या, मग तिसऱ्या अनिलचं नाव सांगतो, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे..

शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का?

सोमय्या म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शिवसेना खासदार भावना गवळी यांना निर्दोष सिद्ध करतात व ईडी सूडबुद्धीने काम करते असा आरोप करतात. परंतु, भावना गवळी यांची चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली. बालाजी सहकारी कारखाना यामध्ये मोठी रक्कम भावना गवळीची असून राज्यसरकार व केंद्र सरकारचा पैसा बुडवला असाही आरोप त्यांनी भावना गवळी यांच्यावर केला.

भावना गवळी यांनी 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखांपेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून हे पैसे काढले आहेत. अन शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करते. शरद पवार आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करताय का? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर त्यांनी सांगावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. तर, शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का, असा सवाल सोमय्या यांनी शदर पवारांना केला.

हिम्मत आहे तर अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद लोकांसमोर ठेवावे

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. सातशे कोटींचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 1 हजार कोटी असलं पाहिजे. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले. 65 कोटीच्या व्हॅल्यूएशनवर 700 कोटींचं कर्ज काढलं?, शरद पवार साहेब यासाठी तुम्हाला सहकार चळवळ हवीय का? असा सवाल सोमय्यांनी केला.

अनिल परब अद्याप मंत्रिमंडळात कसे?

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये घोटाळा झाला होता त्यावर पण आज त्यांनी भाष्य केले.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही तर लीड बँक आहे.कितीही घोटाळा झाला तरी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त आम्ही करणार असे ते म्हणाले. मंत्री अनिल परब यांच्याशी निगडित असलेले परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या ७५० कोटी किंमतीच्या ४० ठिकाणी मालमत्ता असून त्याबाबत आम्ही माहिती काढली असून ती ईडी आणि आयकर विभागास दिली आहे. त्याबाबत त्याची आठ तास चौकशी झाली असून येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यात पहिली कारवाई झाल्याचे दिसून येईल. परब यांचे अनधिकृत हॉटेलचे बांधकाम पडण्याबाबत ठाकरे सरकारने लोकायुक्त यांच्याकडे कळवले असून ही परब अद्याप मंत्री मंडळात राजीनामा न घेता कशाकरिता ठेवण्यात आले याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा. ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबाग परिसरात कार्ले गावात 19 बंगल्याचा घोटाळा आम्ही उघडकीस आणल्याचे ही त्यांनी सांगितले.

आगे आगे देखो, होता है क्या

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्त करण्यात आल्याबद्दल विचारलं असता “आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत सोमय्या यांनी इशारा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या