सोमय्यांच्या 'त्या' जखमेचा रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर; जखम खरी की खोटी?

सोमय्यांच्या 'त्या' जखमेचा रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर; जखम खरी की खोटी?

मुंबई | Mumbai

राणा दाम्पत्यांना (Navneet Rana Ravi Rana) पोलीस ठाण्यात (Police Station) भेटण्यासाठी भाजपाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेले होते. त्यांनतर तिथून निघाले तेव्हा त्यांच्यावर शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती, यामध्ये ते जखमी झाले होते. सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात (Hospital) जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होते, या जखमेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चाही झाली होती. (Kirit Somaiya Attack)

सोमय्यांच्या 'त्या' जखमेचा रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर; जखम खरी की खोटी?
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

अखेर सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल भाभा हॉस्पिटलकडून (Bhabha Hospital) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सादर करण्यात आला आहे. सोमय्यांची जखम ०.१ सेमीचा कट आहे. सूज नाही, रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात नाही, असं अहवालात म्हटले आहे. तसेच कोणतीही मोठी दुखापत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होत?

किरीट सोमय्या २३ एप्रिल रोजी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर (Khar Police Station) त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे.

सोमय्यांच्या 'त्या' जखमेचा रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर; जखम खरी की खोटी?
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

Related Stories

No stories found.