परब यांनी रिसॉर्टसाठी पैसे कुठून आणले?

परब यांनी रिसॉर्टसाठी पैसे कुठून आणले?

मुंबई / प्रतिनिधी
महसूल विभागाने बेकायदा ठरवलेला परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टचे बाजारमूल्य २५ कोटी रुपये असून परब यांनी हा रिसॉर्ट स्वत:च्या आयकर रिटर्नमध्ये किंवा हिशोबात कुठेच दाखविला नाही, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी परब यांनी रिसॉर्टसाठी पैसा कुठून आणला? असा सवाल केला. या प्रकरणी आयकर विभाग, बेनामी मालमत्ता विभाग, ईडी आणि पर्यावरण मंत्रालय तसेच महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणीही सोमैया यांनी केली.

परब यांच्या साई रिसॉर्टचे बांधकाम हे सीआरझेड ३ मध्ये २०० मीटरच्या आत बांधण्यात आले असून ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे रिसॉर्टवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम अंतर्गत ताबडतोब कारवाई करावी, असे आदेश महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हास्तरीय किनारा व्यवस्थापन समिती रत्नागिरी यांनी दिल्याचे सोमैया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याच्या महसूल विभागाने १३ जुलै २०२१ रोजी ही माहिती लोकायुक्त, भारत सरकार तसेच मला कळविल्याचे सोमैया म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. मग अनिल परब यांचा रिसॉर्ट अनधिकृत आहे असे सांगितल्यानंतर ही ठाकरे सरकार ते का तोडत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली.

अनिल परब आणि त्यांचे सहकारी सदानंद कदम यांचे चार्टर्ड अकाऊंटंट केतन जतानिया यांनी हा रिसॉर्ट बांधण्यासाठी ५ कोटी ४२ लाख २४ हजार २०० रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com