Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखडसेंची नाराजी कायम : फडणवीसांची भेट टाळली

खडसेंची नाराजी कायम : फडणवीसांची भेट टाळली

जळगाव- Jalghaon

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात होते मात्र त्यांची भेट टाळून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी कायम ठेवली आहे.

- Advertisement -

जामनेरात होस्पिटलच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. गेल्या काही वर्षांपासून भाजपावर नाराज असलेले एकनाथराव खडसे फडणवीसांची भेट घेतील अशी अटकळ होती. फडणवीस खडसेंच्या भेटीकडे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

अखेर कार्यक्रमाकडे पाठ फिरवून खडसेंनी आपण फडणवीसांवर नाराज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे मात्र खडसेंच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनी जामनेरातील कार्यक्रमाला हजेरी लावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या