खडसेंना राजीनामा देण्याची गरज नव्हती - चंद्रकांत पाटील

आमचे प्रयत्न यशस्वी ठरले
खडसेंना राजीनामा देण्याची गरज नव्हती - चंद्रकांत पाटील

मुंबई -

नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरू होता. आज सकाळी जयंत पाटलांचे ट्वीट रिट्विट केले आणि मग डिलीट केले. तोवर आम्हाला आशा होती की, ते

सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटेलेला नाही, असे आम्हाला वाटले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खडसेंचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. फडणवीसांनी ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होते. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, असेही ते म्हणाले.

खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com