Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकेंदळ खुर्दच्या लोकनियुक्त सरपंचांचा राजीनामा

केंदळ खुर्दच्या लोकनियुक्त सरपंचांचा राजीनामा

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त

- Advertisement -

सरपंच सौ.अनिता अनिल आढाव यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी झालेली ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होऊन सरपंचांसह दहा सदस्य निवडून आले होते. त्यापैकी जय भवानी मंडळाचे विखे, कर्डिले गटाचे सरपंच सौ.अनिता आढाव, उपसरपंच बाळासाहेब आढाव, मंदाकिनी आढाव, वृषाली आढाव, लताबाई मगर, सतीश आढाव, गोरक्षनाथ जाधव हे तर जनसेवा मंडळाचे तनपुरे गटाकडून राजेंद्र आढाव, संगीता केदारी, मनकर्णा सूर्यवंशी हे सदस्य म्हणून निवडून आले होते.

सौ.अनिता आढाव यांनी सरपंचपदाचा राजीनामा राहुरी पंचायत समितीच्या सभापती सौ.बेबीताई सोडनर यांच्याकडे दिला असता हा राजीनामा मंजूर झाल्यावर पुढील सरपंचपद हे सर्वसाधारण महिला असल्याने याचे मंदाकिनी आढाव, वृषाली आढाव, लताबाई मगर हे सदस्य दावेदार असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे.

जनतेतून निवडून आलेल्या सरपंचपदाची निवड जनतेतून होणार का? सदस्यांमधून कशी होणार? असे सवाल करून केंदळ खुर्द ग्रामपंचायत सरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक झाली तेव्हा आमच्या पार्टीच्या निर्णयानुसार सर्वांना संधी मिळावी, यासाठी सरपंचपद हे रोटेशन पद्धतीने अडीच वर्षांचे राहील, त्यामुळे मी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आहे. करोनामुळे राजीनामा देण्यास सहा महिने उशीर झाला. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मला मिळाली आहे.

– अनिता आढाव, प्रथम लोकनियुक्त सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या