
मुंबई | Mumbai
सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे, ती म्हणजे, पुण्यातील (Pune News) कसबा (Kasba Peth Assembly Constituency) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad Assembly Constituency) पोटनिवडणूक (Maharashtra By-Election 2023) बिनविरोध होणार की नाही.
कसबा मतदार संघातील (Kasba Peth By-Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघातील (Chinchwad By-Election) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) या भाजपच्या दोन्ही आमदारांचं निधन झाल्याामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
या दोन्ही जागेवर भाजपचे आमदार राहिलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत महाविकास आघाडी इच्छुक आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या जागा बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजप, शिंदे गटाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी होत आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पिंपरी, कसबा येथील दोन्ही जागा बिनविरोध झाल्या पाहिजे. एखाद्या जागेवरील आमदाराचे निधन झाल्यानंतर त्या जागेवर दुसरे पक्ष उमेदवार देत नाहीत. ही परंपरा आहे. महाराष्ट्रातील परंपरा विरोधकांनी जपली पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी विरोधी पक्षांना केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ही परंपरा, भाजप व आम्ही जपली असल्याचे शिंदे म्हणाले.
आम्हाला परंपरा शिकवू नये - संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी कायम पायमल्ली होत आहे, हे कोणी शिकवू नये, नांदेड आणि पंढरपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणं होती, असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, परंपरा आहे, अंधेरी पोटनिवडणूक देखील बिनविरोध झाली नाही. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही. पण, नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या. या दोन्ही ठिकाणी आमदारांच्या जवळच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद होता. अंधेरीची निवडणूक मुंबईत होती आणि भाजपला जिंकण्याची संधी नव्हती.
काल रात्री दोन्ही पोटनिवडणुकींसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर बैठक करण्यात आली. यासंदर्भात उद्या परत बैठक घेत काय निर्णय घ्यायचा याची चर्चा करणार आहोत. मात्र निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं आमचं मत आहे. पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होईल. पण चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी, अशी चर्चा झाली यासंदर्भातला निर्णय होणार, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.