धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक उत्सुक

मुंबई | Mumbai

सध्या कधी कोणाच्या जिवनावर बायोपिक (Biopic) येईल हे सांगता येणार नाही? सध्या चित्रपटातही (Film) बायोपिकची क्रेझ चालु आहे. यातच आता करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या वक्तव्यामुळे चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माझ्यावर चित्रपट (Film) काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक (Director) रांगेत उभे आहेत. आमच्यावर चित्रपट निघाला तर तो सुपरहिट होईल. व सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politices) काय आहे? असे वक्तव्य करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केले आहे.

करूणा शर्मा या पंढरपूरमध्ये (Pandharpur) आल्या असता विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना अनेक विषयांवर बोलल्या, त्या म्हणाल्या, कोल्हापूर (Kolhapur) येथून पोटनिवडणूक (by-election) लढवणार आहे. त्यामुळे विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला असून 2024 ला परळीतून निवडणूक लढवणार आहे. सध्या सर्वत्र द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाबद्दल चर्चा रंगत आहे. मोठे नेते देखील या विषयावर बोलताना दिसत आहेत. पण देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करूणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी तुरूंगात टाकलं. त्यावर कोणी बोलत नाहीत. असे त्या म्हणाल्या.