Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Election Results : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? खर्गेंनी सांगितली कॉंग्रेसची रणनीती

Karnataka Election Results : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? खर्गेंनी सांगितली कॉंग्रेसची रणनीती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Result) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेस तब्बल १३७ जागांवर आघाडीवर आहे. आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचा कुठला नेता मुख्यमंत्री होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे….

- Advertisement -

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. आता मुख्यमंत्री कोण होईल याबाबत आता काँग्रेसमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) यांनी मुखमंत्री कोण? याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील सर्व विजयी आमदारांची आता बैठक होणार आहे.

Karnataka Election Results : कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला…; प्रियंका चतुर्वेदींची भाजपवर खोचक टीका

या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, त्यांचे नाव हायकमांडच्या समोर ठेवण्यात येईल. यावर हायकमांड अंतिम निर्णय घेईल, से त्यांनी बंगळुरु येथे बोलताना सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Karnataka Election Results : विजयानंतर बोलताना डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; म्हणाले, “मी कधीही विसरू शकत नाही की…”

- Advertisment -

ताज्या बातम्या