Friday, April 26, 2024
Homeराजकीयकारेगाव ग्रा.पं. प्रशासक निवडीचे फ्लेक्सबोर्डद्वारे राजकीय प्रदर्शन

कारेगाव ग्रा.पं. प्रशासक निवडीचे फ्लेक्सबोर्डद्वारे राजकीय प्रदर्शन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कारेगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त कार्यकारी मंडळाची मुदत संपल्यामुळे दि. 11 सप्टेंबरपासुन शासनाने प्रशासकाची नेमणूक केली आहे.

- Advertisement -

प्रशासक निवडीचे तसेच त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड गावात लावण्यात आले आहेत. यातही राजकीय चढाओढ दिसून येत असून याचे परिणाम वेगळे होवू शकतात. तरी प्रशासकांनी याबाबत तातडीने दखल घेऊन फ्लेक्सबोर्डचे सुत्रधार व प्रकाशक यांचेवर विनापरवाना जाहीर फ्लेक्सबोर्ड लाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अधिनियमातील तरतुदी नुसार कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी व संबंधित फ्लेक्सबोर्ड त्वरीत हटविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी केली आहे.

कारेगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रापं) आर. डी. अभंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. अभंग यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहुन प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारले.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिपक पटारे यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यासह ग्रामपंचायत कार्यालयात श्री.अभंग यांचा सत्कार करतानाचे फ्लेक्स बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावलेला आहे.

ग्रामपंचायतीचा प्रशासक अराजकिय असावा म्हणून उच्च न्यायालयाने खाजगी व्यक्तीऐवजी शासकीय अधिकार्‍यांना प्रशासकपदी नियुक्त करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. असे असतानादेखील गावातील राजकिय पदाधिकार्‍यांकडुन प्रशासक निवडीचे राजकीय भांडवल केले जाते आहे.

अशा प्रकारामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असुन, प्रशासकाच्या निःपक्षपाती भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रशासक निवडीचे फ्लेक्सबोर्डद्वारे राजकिय प्रदर्शन करून राजकीय वर्चस्व भासविणेचा व राजकीय फायदा उपटण्याचा विशिष्ट राजकिय गटाचा हेतु व केविलवाणी धडपड दिसून येत असुन हा सर्व प्रकार पूर्वनियोजित घडवून आणला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते व माजी उपसरपंच बाळासाहेब पटारे यांनी केला आहे.

प्रशासकांनी याबाबत तातडीने दखल घेऊन फ्लेक्सबोर्ड चे सुत्रधार व प्रकाशक यांचेवर विनापरवाना जाहीर फ्लेक्सबोर्ड लाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अधिनियमातील तरतुदी नुसार कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी व संबंधित फ्लेक्सबोर्ड त्वरीत हटविण्यात यावा, जेणेकरून सर्व स्तरातील नागरिकांना कुठल्याही राजकीय दडपणाशिवाय निःसंकोचपणे त्यांचे वैयक्तिक अथवा सार्वजनिक हिताचे कामासाठी पोषक व मोकळे वातावरण निर्माण होईल, अशी मागणी बाळासाहेब पटारे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या