Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयकपिल सिब्बल यांचे "ते" ट्विट डिलीट !

कपिल सिब्बल यांचे “ते” ट्विट डिलीट !

दिल्ली | Delhi

काँग्रेस पक्षात जोरदार घडामोडी घडत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकी आधी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन आधीच वाद निर्माण झाला असताना, कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केल्याने मोठी खळबळ उडाली.

- Advertisement -

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते की, “राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली’, मी राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा योग्य पक्ष मांडला. मणिपूरमध्ये भाजपला खाली खेचलं, पक्षाला वाचवलं. गेल्या 30 वर्षात भाजपच्या बाजूने एकही असं वक्तव्य केलं नाही, ज्यामुळे भाजपला फायदा होईल. तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली, असं म्हटलं जात आहे.” या ट्विट मोठी खळबळ उडाली.

मात्र काही वेळातच त्यांनी ते डिलिट करण्यात आले. तसेच ते ट्विट काढताना म्हणाले की, “राहुल गांधींनी स्वत: सांगितलं की त्यांनी अशा शब्दांचा वापर केला नाही. त्यामुळे मी माझं आधीचं ट्विट काढतो आहे.”

- Advertisment -

ताज्या बातम्या