....तोपर्यंत अटक नाही; नितेश राणेंना दिलासा कायम

....तोपर्यंत अटक नाही; नितेश राणेंना दिलासा कायम

मुंबई | Mumbai

शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून मिळालेला दिलासा कायम आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे.

नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवारी दुपारी १ वाजता न्यायमूर्ती सी.वी. भडंग यांच्यापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत नितेश राणेंच्यावतीनं जेष्ठ वकील नितीन प्रधान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता हायकोर्टाचं कामकाज सध्या दुपारी १२ ते ३ या वेळेत सुरू असल्यानं बुधवारी वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.

या अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय आपला निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

आजच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. यावेळी त्यांनी हे प्रकरण निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून उकरुन काढत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. विधानभवनातील म्याव म्याव प्रकरणानंतर जुन्या प्रकरणावरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचे यावेळी राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com