Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणा

महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणा

मुंबई | Mumbai –

महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याची तयारी करा अशी सूचना भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे.पी.नड्डा JP Nadda यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil हजर होते. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे. एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा, असे जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. भाजपा वारंवार त्यांना उघडं पाडत आहे. निर्लज्जपणे आणि स्वार्थासाठी हे सरकार चालवलं जात आहे. सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलेलं असून हे लोकांसमोर आणलं पाहिजे. कोविडची स्थिती हाताळतानाही त्यांनी घोटाळा केल्याचं मला कळालं आहे, असा गंभीर आरोप जे.पी.नड्डा यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या