Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानिपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी शेअर केलेला व्हिडिओ (Jitendra Awhad Shared Crowd Stampede Video) गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीचा आहे.

- Advertisement -

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की हा व्हिडीओ मॉर्फ केलेला नाही. याचं कारण यामध्ये राज्य सरकारची गाडी दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कुठला असेल असा त्यांनी प्रश्न सोशल मीडियावर ट्विट करून विचारला आहे.

मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त

व्हिडिओत पाहायला मिळते की, प्रचंड गर्दीमध्ये एक महिला निपचीत पडली आहे. आजूबाजूलाही काही लोक पडले आहेत. गर्दीचा रेटा मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. व्हिडिओत प्रशासनाचे एक वाहनही सायरन वाजवत उभे असल्याचे दिसते आहे. हा भीषण व्हिडिओ पाहून ट्विटर वापरकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ मात्र नेमका कुठला आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. देशदूत या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

नुकतंच खारघर इथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने खूप मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर २४ हून अधिक जखमी झाले होते. या दरम्यान प्रचंड जनसागर इथे पाहायला मिळाला होता.

प्रशासनाला इतकंही कळत नाही का?, १२ श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राज ठाकरेंचा संतप्त सवाल

या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा चौकशी आयोग नेमावा अशी मागणी आव्हाडांनी केली.

…तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अजित पवारांच्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांचं मोठं विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या