Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजितेंद्र आव्हाडांचा दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा; म्हणाले...

जितेंद्र आव्हाडांचा दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा; म्हणाले…

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar Group0 गटात सामील झालेले दिलीप वळसे-पाटील (Dilip Valase-Patil) यांनी थेट शरद पवारांवर (Statement On Sharad Pawar) टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केले नाही, असे दिलीप वळसे-पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. वळसे पाटील हे सध्या महायुतीच्या तीनचाकी सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत आता नाराजी व्यक्त करण्यात येत असून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलीप वळसे-पाटील यांच्या निष्ठेवरच बोट ठेवले आहे.

- Advertisement -

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही याचे आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. अन् शरद पवारांबद्दल बोलत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Sanjay Raut : लोकसभेसाठी संजय राऊत मैदानात? मतदारसंघही ठरला?

पुढे ते असे ही म्हणाले की, “वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल.” असेही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दिलीप वळसे-पाटील काय म्हणाले होते

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, अशी खोचक टीका वळसे-पाटील यांनी केली.

तसेच कोणाला नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे चॅलेंज देखील त्यांनी या वेळी दिले. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे देखील दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या