Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या...”; स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

“चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या…”; स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

मुंबई | Mumbai

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ठाण्यातला शो बंद पाडून तिथे झालेल्या गोंधळामुळे तर नंतर भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिले आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर करत भाजप नेत्या चित्रा वाघ संतप्त सवाल केला आहे.

“ज्या माणसाने २०१६ ते २०२० माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं?” असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

पुढे आव्हाड म्हणाले आहेत की, “चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या. २०१६ ते २०२० त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा.”

चित्रा वाघ यांनी काय म्हंटल होत?

‘आपण संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत, असं आव्हाड कायम सांगतात, मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पोलीस तपास होईल. आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल, तर ते कधीही शक्य होणार नाही,’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला होता. तसेच ‘ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,’ असा निशाणाही चित्रा वाघ यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या