‘५० खोके, एकदम ओके’; जितेंद्र आव्हाडांच्या केक कटिंगची सर्वत्र चर्चा

‘५० खोके, एकदम ओके’; जितेंद्र आव्हाडांच्या केक  कटिंगची सर्वत्र चर्चा

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात त्यांचे समर्थक वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस (birthday) साजरा करत असून शुभेच्छा देत आहेत...

राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदेंनी आज वाढदिवशीच कोपरी पुलाचे (Kopari bridge) उद्घाटन करून आपल्या समर्थकांना अनोखी भेट दिली. अशातच आता ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी '50 खोके' लिहिलेला केक कापत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसेचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील एका स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला उपस्थित होते. या कार्यकर्त्याच्या केकवर ५० खोके, एकदम ओके, गद्दार फॅमिली असे लिहिलेले होते. हा  केक कार्यकर्त्याच्या वाढदिवसामुळे कापण्यात आला असला तरी, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आव्हाडांना नेमका कोणाला चिमटा काढायचा आहे याची चर्चा रंगत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केक कापतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून या केकच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंच्या बंडखोरीवर टीका केली आहे. "मी केक नव्हे तर खोक्याचं कटिंग करत आहे. खोक्यामध्ये धोका आहे आणि त्याच खोक्यात बोका आहे," अशी टीका यावेळी त्यांनी केली. आव्हाड यांच्या या अनोख्या केक (Cake) कटिंगने राजकीय मनोरंजन घडवून आणले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com