Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशजिग्नेश मेवाणींसह राष्ट्रवादीच्या नेत्याला तुरुंगवासाची शिक्षा... काय आहे प्रकरण?

जिग्नेश मेवाणींसह राष्ट्रवादीच्या नेत्याला तुरुंगवासाची शिक्षा… काय आहे प्रकरण?

दिल्ली | Delhi

आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल (Reshma Patel) आणि सुबोध परमार (Subodh Parmar) यांना महेसाणा कोर्टाने (Mehsana Court) मोठा झटका दिला आहे.

- Advertisement -

जिग्नेश मेवाणी यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिग्नेश मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांनाही तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जिग्नेश मेवाणी, रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना ज्या खटल्यात शिक्षा झाली आहे, तो खटला जवळपास पाच वर्षे जुना आहे. आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार यांच्यावर मोर्चा काढून सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.

रेश्मा पटेल या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. उना येथील दलित मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर १२ जुलै २०१७ रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आझाडू कूच’ नावाने आंदोलन करण्यात आले.

सध्या जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना आसाम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला.

मात्र, काही वेळातच पोलिसांनी जिग्नेशला एका महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केली होती. नंतर मेवाणी यांना या प्रकरणातही जामीन मिळाला होता. सध्या आसाम सरकारने या जामीनाविरोधात गुवाहाटी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आता या प्रकरणावर २७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या