भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...

भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली आहे तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पत्राबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी-शिवसेनेत कोणतंही वितुष्ट निर्माण होणार नाही असे म्हटलं आहे. ज्यांनी पत्र लिहिले आहे त्यांच्या मतदारसंघात काही घडलं आहे का? हे पाहायला पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...
श्रीरामपूरची शिवानी छल्लारे छोट्या पडद्यावरील मालिकेत

जयंत पाटील यांना प्रताप सरनाईक यांच्या पत्राविषयी प्रश्‍न करण्यात आला होता. राष्ट्रवादी शिवेसनेला कमकुवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेलंय असा अता झालेलं नाही. परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईल अस मला वाटत नाही. ज्यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांच्या मतदारसंघात काही झाले आहे का, हे तपासले पाहिजे.

भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...
राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणूका फेब्रुवारी 2022 मध्ये?

Related Stories

No stories found.