'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'

भाजपच्या आंदोलनावर जयंत पाटलांची टीका
'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'

मुंबई | Mumbai

ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण (OBC political reservation) सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Cour) रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.

'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'
OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; महाराष्ट्र भर चक्काजाम आंदोलन

एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपानं आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळपासूनच भाजपानं राज्यातल्या विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान भाजपच्या या आंदोलनावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली.' अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com