हे संकेतांना धरून नाही; जयंत पाटलांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा 'तो' फोटो

हे संकेतांना धरून नाही; जयंत पाटलांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा 'तो' फोटो

मुंबई | Mumbai

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते. मात्र यावर जयंत पाटलांनी टि्वट करीत आक्षेप घेतला आहे.

''मा. सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही'' अशा शब्दात जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय उदय लळीत यांना संस्कृतमधील गौरवपत्र दिले. तसंच उदय लळीत यांच्या पत्नी अमिता यांना मानचिन्ह देण्यात आले.

शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यामूर्ती दीपांकर दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com