Saturday, April 27, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? - जयंत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? – जयंत पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे.

- Advertisement -

प्रश्न धसाला लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरूण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आजगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठक मा. उपमहापौर दीपक मानकर यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी पाटील बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, पुणे शहराध्यक्ष, आ. चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, सेना गटनेते पृथ्वीराज सुतार, शिक्षक संघटनेचे श्री मारणे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी दीवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी स्वागत केले. पाटील म्हणाले की, ‘सरकारने तिजोरी मोकळी झाल्यानंतरही कायम अनुदानित शिक्षकांच्या पुढील अनुदानाचा निर्णय घेतला. तसेच कोरोनाच्या काळात पावलोपावली भाजपाने राजकारणाची संधी साधली. एक बेजाबदार विरोधी पक्ष कसा असू शकतो? याचे उदाहरण भाजपने दिले.

पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरूण लाड हे प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आणि विचारावर श्रद्धा असणारे क्रांतिकारकी घराण्यांची परंपरा असलेले उमेदवार आहेत. ते पदवीधरांच्या प्रश्नासाठी उभे राहतील, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील किती पुढे होते? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.

‘पुणे येथील काही भागातील यादीमध्ये शंभर एक मतदारांच्या नावासमोर एकच मोबाईल नंबर आणि दिलेल्या पत्त्यावर तो मतदार रहात नाही, अशी बोगस मतदार नोंदणी झाली आहे. त्यासंबंधी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी , ‘महाविकास आघाडी सरकारचे अधिकृत दोन्ही उमदेवार यांना मतदाररुपी आशिर्वाद द्यावा, व त्यांना प्रथम क्रमांकाची पसंती देऊन निवडून आणावे असे आवाहन यावेळी केले.

पदवीधर उमेदवार अरूण लाड म्हणाले की , ‘गेल्या अकरा वर्षात मागील पदवीधर आमदार चंद्रकांत पाटील यांनी महामंडळ नेमू असे म्हंटले होते, पण केंद्रात आणि राज्यात सरकार असतानाही ते महामंडळ नेमू शकले नाहीत.

माजी उपमहापौर, नगरसेवक मानकर म्हणाले, ‘आम्ही पुणेकरांनी एकदा एखाद्या विडा उचलला की, त्याला मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही, आणि पुणे पदवीधर मतदार संघात परिवर्तन निश्चित असून पुणेकर मतदार लाड आणि प्रा. आजगावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या