Friday, April 26, 2024
Homeराजकीयजामखेड : 'वंचित'चं सोमवारी तहसील समोर 'पालठोको' आंदोलन

जामखेड : ‘वंचित’चं सोमवारी तहसील समोर ‘पालठोको’ आंदोलन

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी मंजुरी व दोन वर्षापूर्वी ८८ लाख निधी आला तरी काम झाले नाही. त्यामुळे मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन तर आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील खर्डा येथील बाजारतळावर गेल्या ५० वर्षांपासून अनेक गरीब मदारी समाज बांधव गोधडीचे पाल टाकून राहत आहेत. त्यांना व त्यांच्या मुला बाळांना अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा संकटात जीव मुठीत धरून राहावे लागते. हे सर्व लोक कचरा व भंगार गोळा करून कशी बशी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितात. वन्य जीव संरक्षक कायद्यातील जाचक अटीमुळे माकड व सापाचा खेळ करण्याचा पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जो पर्यंत मदारी समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत आंदोलन चालुच राहणार आहे असा ही इशारा अरूण जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या