थोड थांबा... जिल्हा परिषदेत 100 टक्के सत्तांतर होणार

महाविकास आघाडीच्या गटनेत्यांचा गौप्यस्फोट
थोड थांबा... जिल्हा परिषदेत 100 टक्के सत्तांतर होणार
जळगाव जि.प

जळगाव - Jalgaon :

सांगली, जळगाव महापालिकेप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता येणार का? त्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस गटनेत्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा झाल्याची गटनेत्यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी संपर्क साधला असता कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात काही सदस्य आजारी आहेत. सर्व सदस्यांना विश्वात घेऊन जिल्हा परिषदेत बदल घडून येईल. त्यामुळे भाजपासारखी सत्तांतराची घाई नाही. भाजपचे काही नाराज सदस्यही आमच्या सोबत येणार असून जिल्हा परिषदेत शंभर टक्के परिवर्तन घडून येईल.

शशिकांत साळुंके, रा.कॉ. गटनेते

जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अजून 8 महिने बाकी आहे.तरीही त्यादृष्टीने महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आम्ही नाथाभाऊंची भेट घेतली असता जिल्हा परिषदेत पक्ष निहाय सदस्यांचे संख्या बळ जाणून घेतले. त्यानंतर भविष्यात जिल्हा परिषदेत सत्तांतर करायचे असल्याचे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे या वरिष्ठ नेत्यांनी ठरविले तर जिल्हा परिषदेत सत्तांतर शंभरटक्के होईल.

रावसाहेब पाटील, शिवसेना गटनेते

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये पक्ष निहाय जि.प.सदस्यांची संख्या एकनाथराव खडसे यांनी जाणून घेतली असून जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविण्यासाठी किती सदस्यांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने कामाला लागा आणि पूर्ण संख्या बळाची तयारी ठेवा. जिल्हा परिषदेत सत्तांतर शंभरटक्के होणारच.

प्रभाकर सोनवणे, काँग्र्रेस गटनेते

मात्र, करोना संसर्गामुळे काही जि.प.सदस्य आजारी असल्याने सत्तांतराचा डाव पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर केव्हाही जिल्हा परिषदेत सत्तांतर होईल, असा गौप्यस्फोट शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, काँग्र्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते शशिकांत साळुंके, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com