Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या ‘त्या’ नाराज नगरसेवकांची जबाबदारी खा.राऊत, सावंत यांच्यावर

शिवसेनेच्या ‘त्या’ नाराज नगरसेवकांची जबाबदारी खा.राऊत, सावंत यांच्यावर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघडीचे सरकार असतांना मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांनादेखील महानगरपालिकेत कामे होत नसल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली असल्याचे वृत्त रविवार दि. 22 रोजी ‘देशदूत’ मध्ये प्रसिध्द होताच ,

जळगाव मनपातील शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये काही मुद्यांवरुन नाराजी असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत पक्ष नेतृत्वाने या नगरसेवकांची नाराजी तात्काळ दूर करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. कालपासून जळगावातील अनेक नगरसेवकांशी फोनवरुन संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांशी देखील चर्चा करणार असून चर्चेतून नगरसेवकांचे समाधान न झाल्यास लवकरच बैठक आयोजित करुन त्या बैठकीत योग्य ती चर्चा करुन निर्णय घेतला जाईल व याबाबतचा मार्ग काढू. पक्षात पदाधिकार्‍यांची नाराजी असणे ही बाब योग्य नसल्याने नाराजी दूर करुन पक्ष संघटन वाढविण्यास बळ देवू.

- Advertisement -

विनायक राऊत, खासदार

या बाबीची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तसेच जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत व यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव मनपात सत्ताधारी भाजपाकडून शिवसेनेच्या नगरसेवकांवर अन्याय होत असून, गेले दोन वर्षापुर्वी निवडून आलेल्या सेनेच्या नगरसेवकांच्या वार्डात एकही काम होत नसल्याने नागरिकांचा रोष नगरसेवकांना ओढवून घ्यावा लागत आहे.

याबाबत यापुर्वीही अनेकदा शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली असतांनाच दोन दिवसांपुर्वी झालेल्या माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या फलकांवरुन शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्य बाणच गायब झाल्याने नगरसेवकांची ही नाराजी प्रकर्षाने पुढे आली होती.

कोणत्याही पक्षात स्थानिक पातळीवर पदाधिकार्‍यांच्या काही कुरबुरी असतात, मात्र या कुरबुरींना नाराजी म्हणता, येत नाही. राज्यात सेनेचे सरकार आल्यामुळे सहाजीकच जळगाव मनपातील सेनेच्या नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र सरकार आल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून हे सरकार कोविडचा सामना करीत असल्याने काही कामे नक्कीच राहिलेली असतील. जळगावातील सेनेच्या नगरसेवकांच्या या तक्रारीबाबत यापुर्वी देखील आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र लवकरच जळगावात दौर्‍यावर येवून नगरसेवकांची बैठक घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

संजय सावंत, संपर्कप्रमुख शिवसेना

याबाबत ‘देशदूत’ ने रविवार दि. 22 रोजी जळगाव मनपात शिवसेनेला पडणार खिंडार 22 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करताच शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

नाराज असलेल्या काहींनी या वृत्ताचे कात्रण थेट मातोश्रीवर पाठविल्याने पक्ष नेतृत्वाने या बाबीची गंभीर दखल घेत, नगरसेवकांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी संपर्कप्रमुख संजय सावंत व खासदार विनायक राऊत यांच्यावर सोपविली आहे. याबाबत हे दोघेही नेते लवकरच बैठक घेवून नगरसेवकांशी चर्चा करुन त्यांची समस्या जाणून घेतणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या