Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयमीटरबाबत प्रशासन अनभिज्ञ

मीटरबाबत प्रशासन अनभिज्ञ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरास 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या 200 कोटीच्या अमृत योजनेंतर्गत मिटर बसविण्याच्या मुद्याबाबत प्रशासन व पदाधिकारी दोन्ही अनभिज्ञ असणे ही एक शोकांतिका असल्याचे स्पष्ट करीत

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपा कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. तसेच मुदतीत काम पूर्ण न करणार्‍या मक्तेदारांवर काय कारवाई करणार असा खडा सवाल शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी मांडल्याने प्रशासन व पदाधिकारी यांची चांगलीच घुसमट होत असल्याचे निदर्शनास आले.

मनपात विविध महत्वपूर्ण विषयांवर मंजुरीसाठी मंगळवार 24 रोजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीस्थायी शांततेत पार पडली. व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

तसेच उपायुक्त संतोष वाहुळे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, आकाश डोईफोडे, लेखानिरीक्षक पवार व सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज ऑनलाईनद्वारेच पार पडले.

एकमेव तहकूब विषय

स्वच्छ सर्वेक्षण करीता स्थायी समिती ठराव क्र. 277 अन्वये पवन चौधरी याची कंत्राटी तत्वावर अटी व शर्तीस बंधनकारक राहून 6 महिने करीता कंत्राटी तत्वावर नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

मात्र प्रस्तावास झालेला विलंब व अनियमिततेबाबत आक्षेप नोंदवण्यात आला असल्याने आक्षेप ठरावातून वगळणेबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करणे हा विषय तहकुब करण्यात आला आहे. उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण यांनी हा विषय तहकुब ठेवण्याचे सभागृहास सांगितले.

अनेक प्रस्ताव उशीरा

कर सल्लागाराची मुदत मार्च 2020 संपली असतांना त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव उशिरा का आला ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. यात दोषी असणार्‍यांवर दिरंगाईची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाईचे आदेश आयुक्त कुलकर्णी यांनी दिले.

तसेच महापालिका हद्दीतील मेलेले जनावरे उचलून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी असलेले दोघा कर्मचार्‍यांची मानधनावर नियुक्ती न करता त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी तसा ठराव करण्यात आला असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.

ज्योती चव्हाण यांनी पूर्ण शहरासाठी दोनच कर्मचारी असल्याने त्यांचावर ताण पडत असल्याने प्रभाग समिती निहाय कर्माचारी नेमावेत अशी सूचना मांडून या दोघा कर्मचार्‍यांची नियुक्ती 6 ऐवजी वाढीव करून 11 महिन्याची करण्यात यावी अशी मागणी केली.

उज्वला बेंडाळे यांनी या कर्मचार्‍यांची नियुक्तीची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपलेली असून त्यांचा प्रस्ताव उशिराने का आला असा प्रश्न उपस्थित करत सभेत अधिकारी केवळ आश्वसन देत असल्याने नाराजी व्यक्त केली.

यावर आयुक्त कुलकर्णी यांनी आगामी सभेत यावर चर्चा करू असे आश्वासन दिले असता नितीन लढ्ढा यांनी आपण त्या कर्मचार्‍यांना न्याय देऊ शकू किंवा नाही हे स्पष्ट करा असा आग्रह धरला असता आयुक्तांनी सविस्तर चर्चा करून धोरण निश्चीत करावे लागेल असे सांगितले.

कामगार नियुक्तीचा प्रश्न अधांतरीच

बांधकाम विभागातील 3 ट्रॅक्टर भाड्याने घेणे व मजूर पुरवण्याचा प्रश्नावर चांगलीच गरमागरम चर्चा झाली.

मनपाकडे 8 ट्रॅक्टर असतांना व अजून रस्त्याच्या कामासाठी 1 ट्रॅक्टर असतांना अजून मजुरांची व चालकांची गरज काय, मनपाकडे आताही काही चालक रिकामे आहेत असा सवाल नितीन लढ्ढा यांनी मांडला.

तेव्हा रस्त्याची कामे सोडून मनपाच्या इतर कामासाठी मजुरांची खरोखरच गरज असल्याचे अभियंता अरविंद भोसले यांनी स्पष्ट केले.

तेव्हा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक किशोर बाविस्कर हे या ठरावास सूचक व अनुमोदक होते.

सभेतील मंजूर विषय

आयकर सल्लागार विजय शेटे यांना मुदतवाढ देेणे, वाढीव मुदतीसाठी येणारा 1 लाखाच्या खर्चास मान्यता मिळेकामी प्रशासनाच्या प्रस्ताव, मेलेली जनावरे उचलून विल्हेवाट लावण्याकामी नंदू नाडे, अशोक सोनवणे यांची मानधनावर 6 महिनेकरीता नेमणूक करुन मुदतवाढ देणे व याकामी सहा महिन्याचा येणारा रकम 1 लाख 68 हजार मात्रचे खर्चास मान्यता देणे, मनपा हद्दीत डांबरी रस्ते दुरुस्तीकामी 3 ट्रॅक्टर, 9 मजूर पुरवठा करणेकामी मक्तेदार न्य ज्वाला सिक्युरिटी फोर्स याचंचे रकम 2250 प्रती दिन प्रती ट्रॅक्टर व रकम 545 प्रती दिन प्रती मजूर दरास तसेच 12 महिन्याकरीता 41 लाख 95 हजार 800 रुपयाचे खर्चास मान्यता मिळणेबाबत निर्णय घेणे, मनपा हद्दीत मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत दैनंदिन कामासाठी आवश्यक मजूर मक्तेदारामार्फत लावणेकामी मक्तेदार न्यु ज्वाला सिक्युरीटी फोर्स यांचे रकम 545 प्रती दिन मजूर दरास तसेच 12 महिनेकरीता येणारा 47 लाख 8 हजार 800 मात्रचे खर्चास मान्यता मिळणेबाबत निर्णय घेणे, पीएमएवाय अंतर्गत नियुक्त मानधनावरील एकूण 4 कर्मचारी पैकी पुनर्नियुक्ती करीता प्राप्त 2 कर्मचारी यांना पुढील 11 महिनेकरीता पुनर्नियुक्ती देणे तसेच याकामी शासनामार्फत मानधन अदा करणेसाठी निधी प्राप्त होई पावेतो या 2 कर्मचार्‍यांना दरमहा प्रत्येकी 35 हजार रुपये मानधन हे मनपा निधीतून देणेबाबत प्रशासनाच्या प्रस्ताव, प्रभाग 1 ते 8 व 10 ते 19 मधील रस्त्यांवरील खड्डे डांबर मीश्रित खडीने बुजणेकामी मक्तेदार यांचे वाटाघाटी अंती आलेल्या दरास व त्यानुसार येणार्‍या खर्चास मान्यता मिळणेबाबत प्रशासनाचा प्रस्ताव असे एक प्रस्ताव वगळता सर्वच प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या