घरकुल घोटाळ्यातील ‘त्या’ पाच नगरसेवकांना अपात्रतेसाठी ठराव

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची महापौरांकडे मागणी
घरकुल घोटाळ्यातील ‘त्या’ पाच नगरसेवकांना अपात्रतेसाठी ठराव
jalgaon municipal corporation

जळगाव - Jalgaon :

घरकुल घोटाळ्यातील दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या मनपाच्या ‘त्या’ पाच विद्यमान नगरसेवकांना अपात्रतेसाठी ठराव करावा.

अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महापौर जयश्री महाजन यांना दिलेल्या पत्राव्दारे केली आहे.

घरकुल घोटाळाप्रकरणी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, दत्तात्रय कोळी, लताताई भोईटे, सदाशिव ढेकळे आणि स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना शिक्षा झाली आहे.

या पाचही नगरसेवकांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली असून, त्या शिक्षेला कोणत्याहीप्रकारे अद्याप स्थगिती मिळालेली नाही.

त्यामुळे मनपा अधिनियमातील कलम १०,१२ आणि १४ या नियमाने महापालिकेच्या होणार्‍या महासभेत अपात्रतेसदर्ंभात ठराव करावा. अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com