Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या !

जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव महानगरपालिकेत स्पष्ट बहुमतात असलेल्या भाजपला धक्का देवून शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे.

- Advertisement -

या सत्तांतरात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर उपमहापौरपदी बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील हे विराजमान झाले आहे.

दरम्यान, ‘जयभवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात नूतन महापौर जयश्री महाजन यांनी 17 मजली इमारतीच्या 17 व्या मजल्यावरील महापौरांच्या दालनात पदभार स्वीकारला.

यावेळी त्यांनी आगामी अडीच वर्षात जास्तीत जास्त विकासकामांना प्राधान्य देणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

नूतन महापौर जयश्री महाजन, नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे महापालिकेत साडेअकरा वाजता आगमन झाले. त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महानगरपालिकेच्या प्रांगणात फुलांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. महापौरांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

संपुर्ण परिसर भगवेमय झाले होते. महापौरांच्या दालनात सरीता माळी-कोल्हे यांनी नूतन महापौर जयश्री महाजन, नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे औक्षण केले. त्यानंतर महापौरांनी पदभार स्वीकारला.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, ज्योती तायडे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, सुनील महाजन, प्रशांत नाईक, नितीन बरडे, अमर जैन, विष्णू भंगाळे, बंटी जोशी, जितेंद्र मुंदडा, गजानन मालपूरे, निलेश पाटील, राजकुमार अडवाणी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या