पणन महासंघ शिष्टमंडळाची शरद पवारांसोबत चर्चा

पणन महासंघ शिष्टमंडळाची शरद पवारांसोबत चर्चा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या हंगामात कापूस शेतकर्‍यांना कापूस विक्री संदर्भात मोठया प्रमाणावर अडचणी आल्या होत्या. गत हंगामातील कापूस अजूनही...

काही शेतकर्‍यांच्या घरात पडलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीचा सामोरे जावे लागत आहे.

कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व सीसीआय आणि पणन महासंघ यांच्यामधील वेगवेगळ्या करारा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी दि. 8 सप्टेंबर रोजी मुंबई येथे यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे शिष्टमंडळासोबत भेट घेउन चर्चा करण्यात आली असल्याची माहिती पणन महासंघाचे जळगाव विभाग संचालक संजय पवार यांनी दिली.

आगामी कापूस हंगामात कापूस उत्पादक शेतकरी व पणन महासंघ यांचे प्रश्न सोडवण्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे शिष्टमंडळासोबत खा.शरद पवार यांनी शिष्टमंडळासोबत यशवंतराव प्रतिष्ठान येथे सुमारे 45 मिनिट चर्चा करण्यात आली.

तसेच बुधवार दि.9 सप्टेंबर रोजी राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, सहकार व पणन सचिव अनूप कुमार, पणन महासंघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या समवेत पुन्हा समोरासमोर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे देखिल संचालक पवार यांनी सांगीतले.

या बैठकीस कॉटन फेडरेशनचे चेअरमन आनंदराव देशमुख, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. विष्णुपंत सोळुंके, तसेच माजी व्हाईस चेअरमन राजकिशोर मोदी, प्रसन्नजीत पाटील, संचालक शिरीष धोत्रे, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नविन सोना उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com