Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयधुराळा । राष्ट्रवादीत जल्लोष तर भाजपात सन्नाटा

धुराळा । राष्ट्रवादीत जल्लोष तर भाजपात सन्नाटा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँगे्रस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

- Advertisement -

याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजपचा त्याग करुन राष्ट्रवादी काँ्रग्रेसचे घड्याळ शुक्रवारी हातात बांधणार आहे.

त्यामुळे जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करीत नाथाभाऊंच्या प्रवेशासंदर्भात जल्लोष केला. तर भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात बुधवारी सन्नाटा असल्याचे वातावरण दिसून आले.

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला असून भाजपचा त्याग केला आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येप्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून जाहीर केले आहे. त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटू लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, युवा महानगराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, संजय चव्हाण, मंगला पाटील माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, अजय बढे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सलीम इनामदार, माजीनगरसेवक सुनील माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

तर दुपारी 2 वाजेच्या सुमारास फेरफटका मारला असता भाजपच्या कार्यालयात मात्र सन्नाटाचे वातावरण दिसून आले. गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणार्‍या एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा बँक यासह सर्वच क्षेत्रातील समीकरण बदलविणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

खडसे समर्थक मुंबईत दाखल होणार

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणार्‍या एकनाथराव खडसे यांनी भाजप पक्ष सोडल्याचं सांगितले.

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. एकनाथराव खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी समर्थकांसह मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यासाठी खडसेंचे समर्थक बुधवारीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर खडसेंच्या राजीनाम्याचे वृत्त समजल्यानंतर अनेक समर्थकांनी बुधवारी दिवसभर मुक्ताईनगरातील खडसेंच्या फॉर्मवर गर्दी केलेली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या