“तिघांच सरकार... एक सिनियर एक ज्युनियर... दोन बायका फजिती ऐका”; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव | Jalgoan

जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ खडसे यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ लावत टीका केली.

खडसे म्हणाले, येवला आणि बीडमधील सभेपेक्षा आपल्याला जळगावमध्ये जास्त उत्साह जाणवला. शरद पवारसाहेबांचे जळगाव जिल्ह्याशी रुणानुबंध आहेत. आता पुन्हा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडणून आणायचे आहेत. आता आपण व्हिडिओ पाहिलेत, त्यामध्ये फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात बसले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आश्वासन पूर्ण केले नाहीत. आता व्हिडिओ बघितले ना, फडणवीस एकदम खोटारडा माणूस आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल खोटं बोलले. विदर्भ वेगळा झाला नाही तरी लग्न करणार नाही म्हटले होते. मात्र त्यांनी लग्न केले. आज मराठा समाजाला मूर्ख बनवण्याच काम सुरू आहे. सरकार भावनांशी खेळत आहे. तिघांच सरकार, एक सिनियर दोन ज्युनियर, दोन बायका फजिती ऐका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.अजित पवार बोलेल ते करणारा नेता. मात्र आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. क्या हालत बना दी, आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही. तुमचा स्वाभिमान गेला कुठे?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची निती आहे. याच मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. लोक जमले पण अंगणवाडीचे, इतर कर्मचारी होते. काहींना हप्ते देऊन आणले तुम्हाला हप्ते दिले का? तुम्ही कोणासाठी आलात? तुम्ही भविष्यातील पंतप्रधानासाठी आलात, असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलं.ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते मंत्री झाले. एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्याविरोधात ठराव केला. आता खोक्यांमुळे माज आलाय, मस्ती आली आहे. असा हल्लाबोल त्यांनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com