Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजळगाव : दिग्गजांना धक्का देत नवखे उमेदवार विजयी

जळगाव : दिग्गजांना धक्का देत नवखे उमेदवार विजयी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयातील अटीतटीच्या समजल्या जात असलेल्या ग्रा.पं.निवडणूक निकालाची उमेदवारांसह सर्वसामान्य नागरीकांना उत्सुकता लागली होती.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयातील मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी 10 वाजता करण्यात आली.

या निकालाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकारण बदलले असून काही ठिकाणी अनपेक्षित निकाल आल्याने अनेकांना धक्का बसला असून बहुतांश ठिकाणी नवखे उमेदवार निवडून आले आहेत.

जळगाव तालुक्यातून भादली बु. ग्रामपंचायतीत प्रथमच अंजली पाटील तथा अंजली जान गुरू संजान या तृतीयपंथी उमेदवाराने त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे.

जळगाव तहसिल निवडणूक प्रशासनाने अंजली पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता. या निर्णयाच्या विरोधात अंजली पाटील यांनी औरंगाबाद खंडपिठात न्यायासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळून महिला राखीव गटातून उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास मान्यता देण्यात आली होती.

जिल्हयात एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपुष्टात आलेल्या 783 ग्रामपंचायतीच्या 7213 सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार 783 ग्रामपंचायतीपैकी 30 डिसेंबर नंतर माघारीपर्यंतच्या मुदतीअखेर जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतीचे 2003 सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

उर्वरित 687 ग्रामपंचायतीतील 5हजार 155 सदस्यांसाठी 13हजार 247 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शुक्रवार दि.15 जानेवारी रोजीच्या झालेल्या मतदानानंतर आज सोमवार सकाळी जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर मतमोजणी प्रकिया करण्यात आली.

जळगाव तालुक्यात 403 कारभारी

जळगाव तालुक्यात 43 ग्रा.पं.तील 463 सदस्यांसाठी निवडणूक प्रकिया जाहिर झाली होती. त्यापैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 40 ग्रामपंचायतींच्या उर्वरित 403 सदस्यांसाठी निवडणूक मतदान प्रकिया घेण्यात आली.

या निवडणूकीसाठी 1530 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 492 नामांकन अर्ज माघारीनंतर 1038 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज झालेल्या मतमोजणी दरम्यान तालुक्यातून यात शिरसोली प्र.न., शिरसोला प्र.बो. कानळदा, ममुराबाद, नांद्रा, असोदा, भादली बु, फुपनगरी, आव्हाणे आदी मोठया ग्रामपंचायत मतमोजणी करण्यात आली.

दिग्गजांना धक्का

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आदी महाविकास आघाडीसह भाजपा, आदी विविध पक्षांची स्वतंत्रपणे पॅनल टू पॅनल लढत होती.

या निवडणूकीत ग्रामीण भागातून माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांच्याच गटात भाजपाकृत पॅनल विजयी झाले आहे. तर चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश चव्हाण यांचेसह खासदार उन्मेश पाटील यांना धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांनी बाजी मारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या