ट्वीटरवर आक्षेपार्ह टिका करुन एकनाथ खडसेंसह अ‍ॅड. रोहिणी खडसेंची बदनामी

जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
ट्वीटरवर आक्षेपार्ह टिका करुन एकनाथ खडसेंसह अ‍ॅड. रोहिणी खडसेंची बदनामी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, तसेच त्यांची कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर याच्या विरोधात ट्वीटरवरुन आक्षेपार्य टीका करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यांच्या ट्वीटर खात्यावरुन भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर भाजपला ओबीसीचा कळवला कधीपासून आला ? ओबीसी नेत्याचे नेतृत्व संपवितांना हा कळवळा कुठे गेला होता, आता गळा काढण्यात काय अर्थ ? अशा आशयाचे ट्वीट केले होते.

त्यावर 24 जून रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात ट्टीटर धारकाने अ‍ॅड रोहिणी खडसे तसेच एकनाथराव खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केली होती.

सदरचा मजकुर सोशल मिडीयावर प्रसारीत होवून एकनाथराव खडसे व अ‍ॅड. रोहिणी खडसे यांची बदनामी झालेली आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली असून या तक्रारीवरुन शनिवारी आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com