Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात शिवसेना समाप्तीच्या दिशेने, उरणार फक्त भाजप; जेपी नड्डा यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात शिवसेना समाप्तीच्या दिशेने, उरणार फक्त भाजप; जेपी नड्डा यांचं मोठं विधान

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) पडलेली उभी फूट त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) केलेली अटक यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांबाबात एक मोठं विधान केले आहे.

- Advertisement -

भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा करत कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते. नड्डा यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

नड्डा यांनी म्हटले आहे की, भाजप ही एक विचारधारा प्रमाण मानणारी पार्टी आहे. या पार्टीला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे देशात केवळ भाजपच राहणार. आज भाजपसोबत दोन हात करण्याची क्षमता देशात कोणत्याच पक्षात राहिली नाही. त्यामुळे देशातील प्रादेशिक पक्ष संपण्याच्या वाटेवर आहेत. पण, राष्ट्रीय पातळीवरही भाजपसोबत दोन हात करण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष राहिला नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय पक्षांच्या बाबतीत त्यांचा रोख हा काँग्रेसकडे होता.

तसेच, भविष्यात काँग्रेस ४० वर्षांनंतरही भाजपला टक्कर देऊ शकणार नाही. भाजपची विचारधारा लोकांना आवडते आहे. काँग्रेसमध्ये जे लोक २० वर्षांपेक्षाही अधिक काळ राहिले आहेत ते लोकही काँग्रेस सोडून भाजपचा हात धरत आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसही खिळखीळी होईल, असे संकेत नड्डा यांनी अप्रत्यक्ष रित्या दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या