Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजयंत पाटलांचा अजित पवार गटाला इशारा; म्हणाले...

जयंत पाटलांचा अजित पवार गटाला इशारा; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. यादरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर मोठे आरोप केले आहेत. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, अशी टीका अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगात शरद पवार यांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जात. २५ वर्ष सत्ता उपभोगली, शरद पवारांच्या कार्यशैलीमुळे तु्म्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झालात. मात्र त्यांच्या कार्यशैलीवर २५ वर्षानंतर तुम्ही प्रश्न उपस्थित करता. मग २५ वर्ष तुम्हाला शरद पवार यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याच काय?, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

शरद पवार साहेब हुकूमशाह आहेत. ते त्यांच्या मनाने पक्ष चालवतात, अशी टीका होत आहे. मात्र आम्हाला असा अनुभव आला नाही. शरद पवार सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात. तुमच्या कार्यशैलीवर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित करु तेव्हा अवघड होईल, असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला दिला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात? जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, असा थेट आक्षेप अजित पवार गटाने शरद पवारांवर घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या