महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी केली टीका
संजय राऊत
संजय राऊत

पुणे(प्रतिनिधि)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.

राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री जनता ठरवते. त्यामुळे राज्यपालांनी राजभवनमध्ये चांगले राहावे. त्याचा खर्च शासकीय तिजोरीतून केला जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन लॉकडाऊनच्या काळात जनतेला आलेल्या भरमसाठ आलेल्या वीज बिलांबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यावर राज्यपालांनी त्यांना शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्याबाबत राऊत यांना विचारले असतं त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांचा सल्ला घेतला तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकान पाटील यांनी शरद पवार हेच सरकार चालवतात, शरद पवार मुख्यमंत्र्यांना प्रोटेक्ट करता अशा प्रकारची सातत्याने टीका करतात त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, यापूर्वी शिवसेना -भाजपचे सरकार होते त्यावेळीही बाळासाहेब ठाकरे हेच सरकार चालवितात अशी टीका केली जायची. परंतु, अशा प्रकारचे सरकार असल्यावर प्रमुख म्हणून सल्ला घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही वरिष्ठ म्हणून अनेक राज्यांना सल्ला देत असतात. त्यामुळे शरद पवार यांनी आघाडी सरकारला सल्ला दिला तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

चंद्रकांत पाटील यांना काही गोष्टी समजत नाहीत, त्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत. पाच वर्षे ते सत्तेत होते. पुन्हा त्यांना सत्तेचा लाभ घेता आला नाही. शरद पवार ही जेष्ठ नेते आहेत, या मातीतले नेते आहेत. त्यांना देशाच्या आणि राज्याच्या कारभाराचा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ घेतला नाही तर आमच्यासारखे दुर्दैवी आणि करंटे आम्हीच असून असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत दोन्ही राजांनी नेतृत्व करावे

दरम्यान, राज्यपालांना मार्गदर्शन हा असेल तर मी पवारांना विंनाती करतो की तुमच्या मार्गदर्शनाची राज्यपालांना आवश्यकता आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे म्हटले होते. कोणीही यावरून राजकारण निर्माण करून समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून राजकारणासाठी गैरफायदा करून घेऊ नये. त्यामुळे सामाजिक एकोपा बिघडेल असे सांगून राऊत म्हणाले, संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन मोदींच्या दरबारातमराठा आरक्षणाचा विषय न्यावा आम्ही त्यांच्या बरोबर असू. त्यांनी त्याचे क्रेडिट घ्यावे असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com