Friday, April 26, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणावरुन वातावरण खराब करण्याचा डाव

मराठा आरक्षणावरुन वातावरण खराब करण्याचा डाव

नाशिक । Nashik

मराठा आरक्षण उपसमितीचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्ष आहेत. राज्याचे ते माजी मुख्यमंत्री असून आरक्षण टिकावे यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करत असून सर्वांसोबत चर्चा करत आहेत. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वातावरण खराब करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

- Advertisement -

रविवारी (दि.१६) काॅग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही जे चांगले काम करतो ते दिसत नाही. ते दिसावं असं वाटत असत. भाजप आणि काही माध्यमांचे लागेबांधे असून जाणीवपूर्वक काही गोष्टी विरोधात दाखवल्या जातात असा आरोप त्यांनी केला.

पार्थ पवार यांच्या बाबत विचारले असता तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यावर मी काही नाही बोलणार असे ते म्हणाले. सुशांत सिंह विषयावर त्यांनी कॉमेंट करणे टाळले. आमचं सरकार ५ वर्ष चालेल असा दावा त्यांनी केला. करोना संकटाचा अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. महसूल किंवा सरकारच उत्पन्न घटलेलच आहे. पुढिल काळात या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक नियोजनावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सचा फज्जा

कोरोनामुळे कार्यकर्त्यांशी संवाद कमी झाला होता. मोठा हॉल घ्या आणि अंतर ठेवत फक्त 30 लोक बोलवा अस मी सांगितल होत मात्र नाशिकच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त आहे. त्यामुळे माझ्या अपेक्षेपेक्षा जादा गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टनसचा फज्जा उडाल्याची कबुली थोरात यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या