Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकृषी विधेयकाविरोधात संगमनेरात काँग्रेसची तीव्र निदर्शने

कृषी विधेयकाविरोधात संगमनेरात काँग्रेसची तीव्र निदर्शने

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

कोणत्याही चर्चेविना पास झालेले कृषी विधेयक हे शेतकर्‍यांना पूर्णपणे उध्दवस्त करणारे असून यामुळे शेतीमालाचा भाव हा उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे.तसेच नव्या कामगार कायद्यामुळे कामगार रस्त्यावर येणार आहे. हाथरसची दुर्देवी घटना,राहुल गांधाींना धक्काबुक्की ही भाजपने देशात सुरु केलेली हुकुमशाही असल्याची टीका आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली असून नवे कृषी विधेयक व कामगार कायदा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती निमित्त यशोधन कार्यालय येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन करुन तालुका काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नवीन नगर रोड येथे केंद्राच्या कृषी विधेयक धोरणाविरोधात भव्य निदर्शन मोर्चा झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी समवेत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा.खेमनर,तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ,नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, प्रा.बाबा खरात, सौ.मिराताई शेटे, सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सौ.निशाताई कोकणे, शंकर पा.खेमनर, सौ.निर्मलाताई गुंजाळ, गणपतराव सांगळे,संतोष हासे, आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, सिताराम राऊत, सुरेश झावरे, नवनाथ अरगडे, अ‍ॅड.त्र्यंबकराव गडाख, सोमेश्‍वर दिवटे, निखील पापडेजा, सुभाष सांगळे, सौ.अर्चनाताई बालोडे, सुरेश थोरात आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या