Friday, April 26, 2024
Homeराजकीयसरनाईकांविरोधातील ED कारवाईवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सरनाईकांविरोधातील ED कारवाईवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई | Mumbai

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज अंमल बजावणी संचालनालयकडून कारवाई करण्यात आली. ईडीच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शरद पवार यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे. “महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

रावसाहेब दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार?

दोन महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल, या भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता, असा टोला शरद पवार यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. सत्ता गेल्यामुळे त्रास होत असल्याने फडणीस सारखं बोलत असतात. त्यामुळेच त्यांनी मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं वारंवार बोलावं लागतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या