भारत-चीन तणाव : संरक्षणमंत्री शुक्रवारी लडाखला जाणार

चीनच्या हालचालींवर भारताचे बारकाईने लक्ष
भारत-चीन तणाव : संरक्षणमंत्री शुक्रवारी लडाखला जाणार

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांतील वाढलेला तणाव अद्याप कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे शुक्रवारी(9 जून) लडाखला जाणार आहेत. दरम्यान चिनी सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषेवर(एलएसी) आणखी दोन सैनिकांच्या डिव्हीजन तैनात केल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू असताना चिनी सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैनिकांची संख्या वाढवल्याने सीमेवरील तणावात भर पडली आहे. एलएसीवर चीनच्या सुरू असलेल्या हालचालींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. चिनी ज्या प्रमाणा सैन्य वाढत आहेत तेवढ्याच संख्येत भारताकडून सीमेवर जवानांची तैनाती करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com