Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली! पुण्यात ना अजितदादा, ना चंद्रकांतदादा.... जाणून घ्या कोणाच्या...

ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली! पुण्यात ना अजितदादा, ना चंद्रकांतदादा…. जाणून घ्या कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण?

पुणे | प्रतिनिधि

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे पडसाद दिसून येत आहे. अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

- Advertisement -

अशातच १५ ऑगस्ट जवळ आल्याने पुणे जिल्ह्यातील ध्वजवंदन कोण करणार याबाबत चर्चा सुरू असताना शासनाच्या वतीने स्वातंत्रदिनाच्या ध्वजवंदनाच्या जबाबदीचे वाटप केले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर दिली होती. मात्र, अवघ्या चोवीस तासांच्या आत राज्य सरकारकडून त्यात बदल करण्यात आलेला असून पुणे येथे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी राज्यपाल रमेश बैस हे ध्वजवंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता चंद्रकांत पाटील हे ध्वजवंदन करणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. मंत्रिपदाचे वाटप झाले, मात्र अजूनही पालकमंत्रिपदाचे वाटप होऊ शकलेले नाही. स्वातंत्र्यदिन तोंडावर आल्याने सरकारने गुरुवारी (ता. १० ऑगस्ट) स्वातंत्रदिनाच्या ध्वजवंदनाच्या जबाबदीचे वाटप केले होते. मात्र, अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये राज्य सरकारकडून त्यात बदल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची तिढा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी कायम आहे. तसेच, अजित पवार हे पुण्यासाठी आग्रही राहणे सहाजिक आहे. पण, इतर ठिकाणच्या पालकमंत्रीपदावरूनही सध्या महायुतीमध्ये एकमत होऊ शकलेले नाही, त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. आता त्यातही बदल झालेला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. रायगडमध्येही तोच वाद आहे. तिथे शिवसेना आमदार भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. हा वाद टाळण्यासाठी रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. तर पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. पण ही यादी पुन्हा बदलण्यात आली. जुन्या यादीनुसार पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार ते रायगडमध्ये ध्वजारोहण करतील. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहेत. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील, ना अजित पवार असा तोडगा काढण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या